भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें

jayakaranen shramalen bhandati | vedadikan na kale mati | volala sagun murti | pundalikakaranen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाकारणें श्रमलें भांडती । वेदादिकां न कळे मती । वोळला सगुण मूर्ती । पुंडलिकाकारणें ॥१॥ धन्य धन्य पावन देखे । पुण्यभूमि पावन सुरेख । तया गातां होतसे हर्ष । प्रेमानंदे डुल्लती ॥२॥ एका जनार्दनीं शरण । पाहतां पाहतां वेधलें मन । मोक्ष मुक्ति कर जोडून । उभे तिष्ठती सर्वद ॥३॥