भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया परमार्थी चाड

jaya paramarthi chad

जया परमार्थी चाड । तेणें सांडावे लिगाड। धरूनि भजनाची चाड । नित्यनेम आदरें ।।१।। सांडी मांडी परते टाकी। वासुदेव नम घोकी। मोक्ष येईल सुखीं। नाम स्मरतां आदरें ।।२।। रामकृष्ण वासुदेवा । धरी हाचि दृढ भावा। आणिकाचा हेवा। दुरी करी आदरें ।।३।। घाली संतासी आसने। पूजा करी काया वाचा मनें। एका जनार्दनी जाणे । इच्छिले तें पुरवी ।।४।।