भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया हेत नामीं ध्यास । नेणें आणिक सायास

jaya het namin dhyas | nenen anik sayas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया हेत नामीं ध्यास । नेणें आणिक सायास । कोण लेखी संसारास । नामापुढें तृणवत ॥१॥ आम्हां नामाचें भूषण । नामें सुखासी मंडण । नामें होतसे खंडण । नानापरी पापांचे ॥२॥ जपतां नाम मंत्रावळी । काळ कांपतसे चळी । एका जनार्दनीं नव्हळी । रामनामें अतर्क्य ॥३॥