भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जाहलें अंतर्बाह्य

jauniyan ant dhondyasi davilen | suvarna ten jahalen antarbahya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाऊनियां आंत धोंड्यासी दाविलें । सुवर्ण तें जाहलें अंतर्बाह्य ॥१॥ तुमचें तें द्रव्य मोजूनियां घ्यावें । उरलें तें धाडावें गणोबासी ॥२॥ एका जनार्दनीं पाहूनियां दामा । आलिंगिला नामा सद्रदित ॥३॥