भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाउनी निरंजनीं तप आरंभिलें । धांवे देवा वहिलें बोभातसे

jauni niranjanin tap arambhilen | dhanve deva vahilen bobhatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाउनी निरंजनीं तप आरंभिलें । धांवे देवा वहिलें बोभातसे ॥१॥ प्रारब्धाचा ठेवा वैष्णावांचा रावो । नारद तो हा हो आला तेथें ॥२॥ पाहिलासे बाळ सुकुमार सांवळा । दृष्टी कळवळा आला मनीं ॥३॥ एका जनार्दनीं पाहुनी निर्धारीं । मंत्र द्वाद्शाक्षरीं सांगतसे ॥४॥