भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे

jatanna raulin paris mage nama | pahun dya to amhan kaisa ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे ॥१॥ राजाईनें त्वरें आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करीं ॥२॥ जाऊनि चंद्रभागे टाकूनियां दिला । नामदेव आला राउळासी ॥३॥ एका जनार्दनीं मस्तक चरणीं । ठेवूनि विनवणी करी नामा ॥४॥