भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें

jashvanil sada dhyaye dhyanin manin | baisoni smashanin nivantapanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥ तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥ न बुडे कल्पांती आहे तें संचलें । म्हणोनि म्हणती भए भूवैकुंठ ॥३॥ एका जनार्दनी कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥