भजनी मालिका
← भजनांकडे परत

जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य

japatan nam pade dhak | pataken palati trivate dekh | kalikalachen nase duhkh | aisen namin samarthya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य ॥१॥ जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्माज्ञान बोली । वायां शीण आटाआटी ॥२॥ साधनें पुण्य असेल गांठीं । तरीच नाम येईल होटीं । एका जनार्दनीं पोटीं । दया शांति आकळे ॥३॥