भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप तपें तपता कोटीं । होती हिंपुटी भाग्यहीन

jap tapen tapata kotin | hoti himputi bhagyahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जप तपें तपता कोटीं । होती हिंपुटी भाग्यहीन ॥१॥ तया विश्रांतीसी स्थान । पंढरी जाण भुमंडली ॥२॥ योगयाग धूम्रपान करिती । नोहे प्राप्ति तयासी ॥३॥ तो उभा कटीं कर ठेवुनी । समचरणीं विटेवरी ॥४॥ एका जनार्दनीं पाहातां । दिठीं कंदर्प कोटी वोवाळिजे ॥५॥