भजनी मालिका
← भजनांकडे परत

जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं

janv dehaten dekhati tanv majhen mhanati | nimaliya randa poren radatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥ पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला कीं न कळे साचा ॥२॥ जीव आत्मा न मरे कोणे काळीं । निमाला देह चतुष्टयाची होळी ॥३॥ एका जनार्दनीं देहा देखती मरण । गेला आला नाहीं तो तैसाचि जाण ॥४॥