भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला

janoniyan veda hosi kan re gavhara | bhajen tun pamara shriviththala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणोनियां वेडा होसी कां रे गव्हारा । भजें तूं पामरा श्रीविठ्ठला ॥१॥ नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥ एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । सोडविता कोणी नाहीं दुजा ॥३॥