भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनियां मनींचा हेत । केलें सनाथ मजलागीं

janoniyan manincha het | kelen sanath majalagin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणोनियां मनींचा हेत । केलें सनाथ मजलागीं ॥१॥ कृपावंत संत सद्गुरु । भवार्णव तारुं मजलागी ॥२॥ बोलविली आरुषवाणी । श्रीहरिच्या गुणीं आपुलिये ॥३॥ निळा म्हणे नवलचि केलें । अंकिता गौरविलें निज अंकीं ॥४॥