भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें । तुमच्या निजध्यासें मनचि मुरे । तुमचिये भेटीं अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां

janon jatan tumha janivachi viren | tumachya nijadhyasen manachi mure | tumachiye bhetin angachi nure | vachahi vosare stavitan tumhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें । तुमच्या निजध्यासें मनचि मुरे । तुमचिये भेटीं अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां ॥१॥ ध्यानें तुमच्या जीवचि हारपे । तुम्हांसी जाणतां बुध्दीचि करपे । तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें । मिसळें चिद्रुपें चैतन्येंसी ॥२॥ तुमच्या आठवें निळाची नाहीं । तुम्हीचि अवघे अंतर्बाहीं । तुम्हाविण दुसरें नुरेचि कांहीं । नाम रुप तेंहि आवघे तुम्ही ॥३॥