भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला

janmavari shin kela | ant:kalin vyartha gela

रचनाकार: संत रामदास · अभंग
जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ।। काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ।। घरवाडा तो राहिला । प्राणी जातसे एकला ।। धनधान्य तें राहिलें । प्राणी चरफडीत गेले ।। इष्टमित्र आणि सांगाती । आपुलाल्या घरां जाती ।। दास म्हणे प्राणी मेले । कांहीं पुण्य नाहीं केलें ।।