भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मातर सुखे घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवु

janmatar sukhe gheun | shriviththalanam athavu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मातर सुखे घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवु ॥१॥ नाहीं त्यांचे आम्हां कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥ कळिकाळाचें भय तें किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥ एका जनार्दनीं सिद्धी । नामें तुटती उपाधी ॥४॥