भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे

janmasi yeuni paha re pandhari | viththal bhimatirin ubha ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मासी येऊनि पहा रे पंढरी । विठ्ठल भीमातीरीं उभा असे ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । आलियांसी तारी दरुशनें एका ॥२॥ पंचक्रोशी प्रानी पुनीत पै सदा । ऐशी ही मर्यादा पंढरीची ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनगजर । ऐकतां उद्धार सर्व जीवां ॥४॥