भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे

janmamaranachen tutalen sankaden | kaivalya rokaden ubhen ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे ॥१॥ डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥ एका जनार्दनीं संशयाचें नाहीं । जन्ममरण देहीं पुन्हा नये ॥३॥