भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये

janmamaran sankaden nivaravaya koden | viththal ughaden pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥ तयाचे चरणां मिठी घाली मना । नाहीं तुज यातना जन्मकोटी ॥२॥ चंद्रभागे स्नान पुंडलीक भेटी । पूर्वजा वैकुंठीं मार्ग सोपा ॥३॥ महाद्वारीं नाचा जोडोनियां पाणी । पुढें चक्रपाणी उभा विटे ॥४॥ एका जनार्दनीं तयांसी भेटतां । मोक्ष सायुज्यता पायीं लागे ॥५॥