भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना

janmakalin deven pratidnya pain keli | shatakoti lihili kavyarachana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥ चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥ लाडका तो नामा समाधी महाद्वारीं । समदृष्टी हरी वरी त्याची ॥३॥ पाळोनियां लळा समाधी ठेविला । एका जनार्दनीं झाला आनंदमय ॥४॥