भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही

janivechya magen hot kunthakunthi | he ton pravrutti nivrutti marga donhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणिवेच्या मागें होत कुंथाकुंथी । हे तों प्रवृत्ति निवृत्ति मार्ग दोन्ही ॥१॥ जाणीव शहाणीव येथें नाहीं काम । वाचे वदतां नाम सर्व साधे ॥२॥ जाणिव जाणपण नेणिवा नेणपण दोहींचे । अधिष्ठान एकनाम ॥३॥ एका जनार्दनीं नामक परतें आन । दुसरें साधन सीण जगीं ॥४॥