भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणीवेचा झाला फुंद । भाग्य मंद नेणे तो

janivecha jhala phund | bhagya mand nene to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणीवेचा झाला फुंद । भाग्य मंद नेणे तो ॥१॥ सांगतांहि न मानी हीत । करी आघात आपुल ॥२॥ मना आला अर्थ काढी । ओढे ओढे अहंतेचे ॥३॥ निळा म्हणे व्दैतबुध्दि । नये तो कधीं परिपाका ॥४॥