भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं

janati he kala haraponi geli | vrutti mavalali tayamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणती हे कळा हारपोनि गेली । वृत्ति मावळली तयामाजीं ॥१॥ पाहतां पहाणें हारपोनि गेलें । मी माझें सरलें तयामाजीं ॥२॥ अंतर बाहेरीं पाहतां शेजारीं । शून्याची वोवरी ग्रासियेली ॥३॥ ग्रासियेलें तेणें चंद्र सुर्य दोन्हीं । एका जनार्दनीं आनंद झाला ॥४॥