भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणती हे हातवटी । संत पोटीं दयाळू

janati he hatavati | sant potin dayalu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणती हे हातवटी । संत पोटीं दयाळू ॥१॥ न म्हणती अधम जन । करिती कृपेचें पोषण ॥२॥ शुचि अशुचि न म्हणे कांहीं । एकरुप वर्ते देहीं ॥३॥ एका जनार्दनीं मज । तारियेलें तेणे सहज ॥४॥