भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणतेपणें विधिनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर

janatepanen vidhinishedh potin | adnyan ten drushti pale dur

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणतेपणें विधिनिषेध पोटीं । अज्ञान तें दृष्टी पळे दूर ॥१॥ अज्ञान बरवें अज्ञान बरवें । सज्ञान तें हावे बुडोनि जाये ॥२॥ अज्ञानें ज्ञान होतसे आपण । सज्ञानें मीतूपण घडतसे ॥३॥ एका जनार्दनीं अज्ञानाची बरा । सज्ञनाचा वारा नको मज ॥४॥