भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनें माझें केलें असे हित । दाविला देहातीत देव मज

janardanen majhen kelen ase hit | davila dehatit dev maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनें माझें केलें असे हित । दाविला देहातीत देव मज ॥१॥ नाठवे भाव अभावना तें कांहीं । स्वर्ग मोक्षनाहीं चाड आम्हां ॥२॥ देहांचें देहत्व देहपण गेलें । एका जनार्दनीं केलें विदेहत्व ॥३॥