भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनें मज सांगितला मंत्र । रामनम पवित्र जप करीं

janardanen maj sangitala mantra | ramanam pavitra jap karin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनें मज सांगितला मंत्र । रामनम पवित्र जप करीं ॥१॥ सोडवील राम संसार सांकडीं । न पडेचि बेडी अरिवर्गां ॥२॥ जप तप साधन पुराण श्रवण । नाम घेतां जाण सर्व घडती ॥३॥ एका जनार्दनीं टाकुनी संशयो । नाम मुखीं राहो प्रेमें पोटीं ॥४॥