भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनें कृपा केली । माझे खांदी कावड दिली

janardanen krupa keli | majhe khandi kavad dili

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनें कृपा केली । माझे खांदी कावड दिली ॥१॥ सांगितला सोपा मंत्र । वाचे वदे हरिहर ॥२॥ बहुत साधनें न करिता । अनायासें आलें होतां ॥३॥ पूर्ण कॄपें जनार्दन । एका जनार्दनीं निजखुण ॥४॥