भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनें केलें अभिनव देखा । तोडियेलें शांखा अद्वैताची

janardanen kelen abhinav dekha | todiyelen shankha advaitachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनें केलें अभिनव देखा । तोडियेलें शांखा अद्वैताची ॥१॥ केला उपकार केला उपकार । मोडियेलें घर प्रपंचाचें ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें देव । दाविला नवलाव अभेदाचा ॥३॥