भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनें आम्हां सांगितलें गुज । पूजावे हे द्विज आवडीनें

janardanen amhan sangitalen guj | pujave he dvij avadinen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनें आम्हां सांगितलें गुज । पूजावे हे द्विज आवडीनें ॥१॥ मुखीं ज्याच्या तोचि नारायण । भिन्नभाव जाण भावूं नको ॥२॥ भाविकांहि भिन्न तयासी दंडिती ।रवरव भोगिती कुळांसहित ॥३॥ एका जनार्दनीं ब्राह्मणांची पूजा । चुकवील खेपा संसारींच्या ॥४॥