भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रय दातारु

janardanacha guru | svami dattatray dataru

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रय दातारु ॥१॥ त्यांनीं उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥२॥ सच्चित्सुखाचा अनुभव । दाखविला स्वयमेव ॥३॥ एका जनार्दनीं दत्त । वसो माझ्या हृदयांत ॥४॥