भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये

janapanen vastu janon mi jaye | majhi janiv kaisi maj ad thaye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणपणें वस्तु जाणों मी जाये । माझी जाणीव कैसी मज आड ठाये ॥१॥ जाणों मी कैसें जाणों मी कैसें । जाणपणें पिसें लावियेलें ॥२॥ जाणपणाचें पडळ जें आलें । जवळीचे वस्तुचें देखणे ठेलें ॥३॥ एका जनार्दनीं सुदलें अंजन । पडळ भेदोनियां दाविलें निधान ॥४॥