भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा

jalatiya ghara | kon vasti kari thara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा ॥१॥ तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥२॥ नाहीं मंत्रशुद्धीचें ज्ञान । भलतियाचें फुंकिती कान ॥३॥ मनुष्य असोनी गुरु पाही । एका जनार्दनीं तें नाहीं ॥४॥