भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळ स्पर्शा जाता स्नानीं । तंव चिन्मात्र भासे जीवनीं

jal sparsha jata snanin | tanv chinmatra bhase jivanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जळ स्पर्शा जाता स्नानीं । तंव चिन्मात्र भासे जीवनीं ॥१॥ कैसी वहाताहे गंगा । स्नानीं हारपलें अंगा ॥२॥ अंगत्व मुकलें अंगा । स्नानीं सोवळी जाली गंगा ॥३॥ एका जनार्दनीं मज्जन । सकळ तीर्थे जालीं पावन ॥४॥