भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे । त्याचें कर्तृत्व वाडें । फांशाधीन

jaisi phanshachi gati pade | taisa songatin dav pade | tyachen kartrutva vaden | phanshadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जैसी फांशाची गति पडे । तैसा सोंगटीं डाव पडे । त्याचें कर्तृत्व वाडें । फांशाधीन ॥१॥ झाला देखणा परी । उगला वर्तूं लागे शरीरीं । तैसी शक्ति ईश्वरीं । भूतें चळती ॥२॥ अदृश्य गतीनें वर्तती । तेथें ईश्वराची शबल शक्ति । तेथें आणिकांची मति । कांही न चाले ॥३॥ यालागीं प्राचीनाधीन । ब्रह्मा विष्णु रुद्र पुर्ण । याचें कार्यभुत जाण । सृष्टादिक ॥४॥ एका जनार्दनीं जाण । बाधक अदृश्य शक्ति जाण । जैसें ज्याचें प्राचीन । तैसें ते वर्तती ॥५॥