भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी

jaishiya taisa miloniyan | nenave mhanoniyan konasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥ गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥ डोळा देखतां एकचि दिसे । करितां जैसे भिन्न नये ॥३॥ निळा म्हणे वाचा वदतां । दिसती ऐक्यता परि भिन्न ॥४॥