भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाईजण्या बळें पोरा घालिसी हुंबरी । विचकिसी दांत पुढें पडसिल फेरी

jaijanya balen pora ghalisi humbari | vichakisi dant pudhen padasil pheri

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाईजण्या बळें पोरा घालिसी हुंबरी । विचकिसी दांत पुढें पडसिल फेरी ॥१॥ पाहे हरिकडे । मग हुंबरी घाली कोडें ॥२॥ उडसील बळें ज्याच्या वोळखे तो आधीं । नाहीं तरि वायां जासी न पडे उपाधी ॥३॥ निळा म्हणे सांगितलें हीत धरी पोटीं । निजभावें शरण रिघे कान्हो जगजेठी ॥४॥