भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव

jahali geli tutali khuntali hav | pahatan pahanen ekachi jahala dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव ॥१॥ जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥ न कळे लाघव खेळ खेळ करूणादानी । कायावाचामनें शरण एका जनार्दनीं ॥३॥