भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणें

jagasi tarak hari ha uchchar | sarva verajhar khuten jenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगासी तारक हरि हा उच्चार । सर्व वेरझार खुटें जेणें ॥१॥ पाहता ब्रह्मांडीं व्यापका तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं भरलासे ॥२॥ एका जनार्दनीं रिता ठाव कोठें । पुंडलीक पेठे उभा नीट ॥३॥