भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तुं श्रम न करीं जना

jagamajin kirti aik shriram | vauga tun shram na karin jana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तुं श्रम न करीं जना ॥१॥ सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा काय उणें ॥२॥ येणें यातायाती चुकती संसार । भवभ्रम निर्धार दुरी ठाके ॥३॥ सांपडलें वर्म आम्हां इह जनीं । एका जनार्दनीं नाम गाऊं ॥४॥