भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगाचियें देहीं नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा

jagachiyen dehin nandato apan | tari karaten karma pariyesa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगाचियें देहीं नांदतो आपण । तरी करतें कर्म परियेसा ॥१॥ जीव शिव दोन्हीं शरीरीं नांदती । कर्मधर्म स्थिति तया हातीं ॥२॥ शिव तो उपाधीवेगळाचि वसे । कामक्रोध पिसें जीवालागीं ॥३॥ लिगाडाचे मिसें जीवासी बंधन । एका जनार्दनीं जाण शिव मुक्त ॥४॥