भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगाचिये नेत्री दिसे तो संसारीं । परि तो अंतरीं स्फटिक शुद्ध

jagachiye netri dise to sansarin | pari to antarin sphatik shuddha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगाचिये नेत्री दिसे तो संसारीं । परि तो अंतरीं स्फटिक शुद्ध ॥१॥ वायांचि हांव नधरी कांहीं पोटीं । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥ स्त्रिया पुत्र धन नाही तेथें मन । इष्टमित्र कारण नाहीं ज्याचें ॥३॥ एका जनार्दनीं प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तयालागीं ॥४॥