भजनी मालिका
← भजनांकडे परत

इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणें सर्व देख

ishta mitra bandhu chulate putane | kalache posanen sarva dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणें सर्व देख ॥१॥ यमाची यातना पडतां जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥ जोंवरी आहे तुज जवळी धन । तोंवरी पिशून म्हणती माझें ॥३॥ एका जनार्दनीं जवळी आला काळ । तेव्हा ते निर्बळ सर्व होती ॥४॥