भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रिये नाना छळती पामरें । समाधान शरीरें नोहे कधीं

indriye nana chhalati pamaren | samadhan shariren nohe kadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इंद्रिये नाना छळती पामरें । समाधान शरीरें नोहे कधीं ॥१॥ त्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परि त्या सर्वेश्वरा न भजती ॥२॥ विषयाचे कामें करिती विवंचना । परी नारायणा न स्मरती ॥३॥ एका जनार्दनीं कृपा नव्हती पूर्ण । इंद्रियां समाधान केवीं होय ॥४॥