भजनी मालिका
← भजनांकडे परत

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं

ihalokin bara to paralokin vandya | tyasi bhedatva nindya uralen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥ परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥ वाद वेवादा नोहे त्याची मती । हृदयीं भगवद्भक्ति सदा वाहे ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें विरळे प्राणी । कोटी माजीं जनें एक देखो ॥४॥