भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनियां तेचि राहिले निवांत । रुपीं अखंडित होउनी संत

houniyan techi rahile nivant | rupin akhandit houni sant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
होऊनियां तेचि राहिले निवांत । रुपीं अखंडित होउनी संत ॥१॥ नित्य निरामय अखंड अव्दय । ध्याती देवत्रय ज्यातें सदा ॥२॥ येकविसा स्वार्गातें कवळुनी राहिलें । सूर्या प्रकाशिेलें जेणें तेजें ॥३॥ निळा म्हणे कृपा करुनिया सद्गुरु । देती अभयकरु त्यासी फावे ॥४॥