भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव

houni vaishnav | jo kan nindi sadashiv

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥ त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥ भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥ एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥