भजनी मालिका
← भजनांकडे परत

होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी

hotan dvarapal laj vate thori | na sahe bhikari jala hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥ बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥ गर्भ न साहाती यातायाती जना । एका जनार्दनीं शरण वेगें ॥३॥