भजनी मालिका
← भजनांकडे परत

होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय

honar janar na chuke kalpantin vaugi | kunthakunthi karuni kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥ लिहिलें संचितें न चुके कल्पांतीं । वाउगाचि भ्रांतीं फळ काय ॥२॥ एका जनार्दनीं प्रारब्धाचा भोग । करितां उद्वेग न टळेची ॥३॥