भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीच मुख्य उपासना । तुमच्या चरणां दंडवत

hich mukhya upasana | tumachya charanan dandavat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हीच मुख्य उपासना । तुमच्या चरणां दंडवत ॥१॥ गुणदोष पाहुं नका । कीर्तनीं सुखा लुटवें ॥२॥ संतचरणीं सदा भाव । करा वाव संसार ॥३॥ लडिवाळ जनार्दनीं एका । कीव देखा भाकितसे ॥४॥