भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिविण नाही वेदांदिका मती

harivin nahi vedandika mati

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरिविण नाही वेदांदिका मती । श्रुती त्या संपत्ती जया रूपी ॥१॥ हरी हाची सर्व उपनिषद भाव । रोहिणीची माव जनी दिसे ।।२।। सर्वघटी राम जीवशिव सम । सर्वरूपे ब्रह्म भरले सदा ॥३॥ सोपान निकट परब्रह्म सेवी । सर्व हा गोसावी विड्ठलराज ।।४।।